Join us

Remembering SSR: जग सोडून जातेवेळी इतकी संपत्ती मागे सोडून गेला होता सुशांत सिंग राजपूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:53 AM

Sushant Singh Rajput Death Anniversary : काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. 

ठळक मुद्दे14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary)कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अ‍ॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला. आज सुशांतचा पहिला स्मृतीदिन. आज त्याच्या स्मृतीदिनी आम्ही तुम्हाला सुशांतच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत. 

सुशांत रॉयल मनाचा उमदा स्टार होता. त्याची लाईफस्टाईलही अगदीच रॉयल होती. रिपोर्टनुसार, सुशांतजवळ सुमारे 59 कोटींची संपत्ती होती. करिअरच्या सुरुवातीला सुशांत मालाड येथे 2 बीएचकेच्या घरात रहायचा. यश मिळत गेले आणि सुशांतने 2015 मध्ये पाली हिल येथे एक पेन्टहाउस विकत घेतले होते.  या पेन्टहाउसची एकू किंमत 25 कोटी रुपये  असल्याचे कळते. सुशांत प्रत्येक सिनेमासाठी 5-7 कोटी रूपये घ्यायचा. तसेच जाहिरातींसाठी 1 कोटी रुपये घ्यायचा. सुशांतने चंद्रावर जमीन खरेदी केली होती. इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्रीकडून त्याने ही जमीन खरेदी केली होती. चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत पहिला बॉलिवूड स्टार होता. सुशांतने चंद्रावर जी जमीन घेतली ती कायदेशीररित्या त्याच्या नावावर कधीच होऊ शकत नाही तरी तिथे जमीन विकत घेतल्याबद्दल त्याला एक विशेष सर्टिफिकेट देण्यात आले होते. सुशांतला अद्यावत कार आणि बाइक्सची तुफान वेड होते.

सुशांतच्या कलेक्शनमध्ये मसेराटी क्वाट्रोपोर्टो कार (किंमत जवळपास 1.5 कोटी) लँड रोवर, रेंज रोवर एसयूव्ही, आणि बीएमडब्ल्यू  K1300R बाइक होती. या बाइकची किंमत जवळपास 25 लाख रुपये आहे.  खगोलशास्त्रीची आवड असलेल्या सुशांतने एलएक्स-600 नावाचा टेलिस्कोप खरेदी केला होता.  ज्यातून तो तासन् तास आभाळातले तारे, ग्रह पहायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. हा जगातील सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स टेलिस्कोप मानला जातो.

भारतात याची किंमत सुमारे 10 लाख सांगितली जाते. सुशांतने बोइंगचे बेसिक फ्लाइट सिम्युलेटरही खरेदी केले होते. याचा वापर पायलट ट्रेनिंगमध्ये केला जातो. सुशांत पायलट ट्रेनिंग घेत होता आणि लवकरच त्याला अधिकृतपणे पायलटचे सर्टिफिकेट मिळणार होते.14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. अर्थात वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत