सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज एक नवा खुलासा होता. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखती रिया चक्रवर्ती म्हणाली होती की, सुशांतचे त्याच्या वडिलांसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. ते एकमेकांच्या संपर्कातदेखील नव्हते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांतचे कॉल रेकॉर्डसमोर आले आहे. त्यात सुशांत वडिलांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
वडिलांच्या संपर्कात होता सुशांतरिपोर्टनुसार, सुशांतने वडिलांनी 2020 मे महिन्यात 3 वेळा कॉल केला होता. तर 6 जूनला त्याने वडिलांना व्हॉट्सअॅप चॅट कॉल केला होता. कॉल रेकॉर्डनुसार सुशांतने वडिलांना 3 वेळा कॉल केलेला तर वडिलांनी एक वेळा कॉल केला होता. रियाला एनसीबीने उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आहे.
रियाची सुशांतच्या बहिणीविरोधात तक्राररियाने सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंका सिंह आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतरांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती यांनी सुशांतसिंग राजपूत यांचे बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनविण्यावरून ही तक्रार दाखल केली आहे. एनडीपीएस कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल आणि टेल मेडिसिन प्रॅक्टिस गाईडलाईन्स 2020 अंतर्गत तक्रार दिली आहे. रिया चक्रवर्ती हिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ८ जून रोजी रिया चक्रवर्ती यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंग राजपूत यांची बहीण प्रियंका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉ. तरुण कुमार यांच्याकडून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करून घेतलं होतं. सतीश डॉक्टर तरुणकुमार डॉक्टरांनी लिहिलेली औषधे एनडीपीएस कायद्यांतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे.