Join us

सुशांतच्या आठवणीत अंकिता पुन्हा झाली भावूक; शेअर केला अभिनेत्याचा Unseen photo

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 8:58 AM

Ankita lokhande: अंकिता आणि सुशांत यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. परंतु, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) हे नाव विसरणं कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. पवित्र रिश्ता ते एम.एस.धोनी असा प्रवास करणाऱ्या सुशांतने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. परंतु, १४ जून २०२० रोजी त्याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कलाविश्वासह त्याच्या प्रत्येक चाहत्याला जबर धक्का बसला. विशेष म्हणजे या धक्क्यातून अद्यापही त्याचे कुटुंबीय सावरले नाहीयेत. त्यामुळे आजही त्याची बहीण सातत्याने त्याला न्याय मिळवण्याची मागणी करत आहे. यामध्येच सुशांतच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त तिने सोशल मीडियावर त्याचे काही Unseen photos शेअर केले. सोबतच भावूक पोस्टही लिहिली.

अंकिता आणि सुशांत यांचं नातं कोणापासूनही लपलेलं नाही. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली. परंतु, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही. मात्र, ब्रेकअपनंतरही त्यांच्यातली मैत्री कायम होती. म्हणूनच, सुशांतच्या निधनाचा अंकितालाही बराच धक्का बसला. वेळोवेळी तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या. यात सुशांतला जाऊन चार वर्ष झाल्यानंतर ती पुन्हा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत त्याच्या लाडक्या श्वानासोबत फजसोबत दिसून येत आहे. अंकिताने हा फोटो शेअर करत त्याच्या बॅकग्राउंडला 'कल हो ना हो' या गाण्याची 'हार्टबीट'ची ट्यून प्ले केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पवित्र रिश्ता या मालिकेला १५ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तिने या मालिकेतील काही फोटो शेअर केले होते. सोबतच तिने सुशांतसाठीही खास पोस्ट लिहिली होती. सुशांत आणि अंकिता यांनी जवळपास ७ वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर काही कारणास्तव ते विभक्त झाले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडेसेलिब्रिटीटेलिव्हिजनबॉलिवूड