Join us

सुशांतची स्थिती खूप गंभीर होती...! थेरपिस्टचा नवा दावा, रियाची घेतली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 10:13 AM

सुशांत आत्महत्या प्रकरणाला आणखी नवे वळण

ठळक मुद्देअलीकडे सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने  एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशांत अजिबात नैराश्यामध्ये नव्हता, असा दावा केला होता

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहेत. रोज नवे खुलासे केले जात आहेत. अगदी सुरुवातीला सुशांत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा बळी ठरला, असा आरोप करत अनेकांनी नेपोटिजमचा मुद्दा उचलून धरला. आता मात्र हे संपूर्ण प्रकरण रिया चक्रवर्तीभोवती केंद्रीत झाले आहे.  सुशांतचे वडील केके सिंग  यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात पाटणा पोलिसात एफआयआर दाखल केल्यानंतर प्रकरणाने एकदम कलाटणी घेतली आहे. आता सुशांतच्या थेरपिस्टने एक नवा खुलासा करत, रियाची बाजू घेतली आहे.

डॉ. सुजैन वॉकर ही सुशांतची थेरपिस्ट होती. तिने स्वत: समोर येत, सुशांत डिप्रेशनमध्ये होता, ही गोष्ट कन्फर्म केली आहे. हिंदुस्तान टाईम्सने सुजैनच्या एका व्हिडीओच्या हवाल्याने याबाबतचे वृत्त दिले आहे. थेरपिस्ट सुजैनने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतची स्थिती गंभीर होती. ‘ सुशांत नैराश्य आणि बायपोलर या समस्येशी लढत होता. सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडियावर यासंदर्भात काही चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे मला यासंदर्भात पुढे यावे लागत  आहे. मी सुशांत आणि रियाला अनेक वेळा भेटले आहे. 2019 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यानंतर आता जूनमध्ये देखील रियाशी बातचीत झाली होती,’असे सुजैनने सांगितले आहे.

सुशांतची स्थिती गंभीर होती आणि याकाळात रिया मजबुतीचे त्याच्यासोबत उभी होती. ती सुशांतची पुरेपूर काळजी घेत होती. पहिल्यांदा कपल म्हणून मी या दोघांना भेटले तेव्हा, रियाची सुशांतबद्दलची काळजी बघून प्रचंड प्रभावित झाले होते. रिया  रिया फक्त त्याच्या अपॉइंटमेंट घ्यायची नाही तर त्याने त्यासाठी उपस्थित राहावे, यासाठी त्याला हिंमत देखील देत असे, असेही या थेरपिस्टने म्हटले आहे.अलीकडे सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने  एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशांत अजिबात नैराश्यामध्ये नव्हता, असा दावा केला होता. तो डिप्रेशनमध्ये नव्हताच, हे मी दाव्यानिशी सांगू शकते, असे अंकिता म्हणाली होती. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती