सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआयने चौकशी करायला सुरूवात केली आहे. शुक्रवारी सीबीआयने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली. यापूर्वी रियाने एका खासगी वाहिनीला मुलाखत दिली होती. ज्यात तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता पण आता तिच्या खुलाशांवर आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने एका गोष्टीवरून रियाची मोठी चूक पकडली आहे.
श्वेता सिंग किर्तीने रिया चक्रवर्तीने खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतील एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात रिया सांगतेय की, खारमध्ये माझी एक प्रॉपर्टी आहे, जी मी सुशांतला भेटण्याआधी विकत घेण्यासाठी प्रयत्न करत होते. ज्याची किंमत 72 लाख रुपये आहे. या घरासाठी मी 50 लाखाचे लोन घेतले आहे. सर्व पेपर मी ईडीला दिले आहेत. या घराचे लोन अद्याप मी भरते आहे. मला 50 लाख रुपये द्यायचे आहेत. 17 हजार माझा महिन्यांचा ईएमआय आहे. आता माहित नाही मी कशी भरणार?
आता श्वेता सिंग किर्तीने रिया चक्रवर्तीच्या या वक्तव्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे. तिने ट्विट केले की, तुम्ही या गोष्टीमुळे चिंतेत आहात की 17 हजारचा ईएमआय कसा भरणार ? कृपया मला सांगा की भारतातील सर्वात महागड्या वकिलाची फीज कशी देणार आहेस ?
कोण आहेत रिया चक्रवर्तीचे वकील?रिया चक्रवर्तीने आपली केस लढण्यासाठी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांची निवड केली आहे. मानशिंदे हे तेच वकील आहेत ज्यांनी सलमान खान आणि संजय दत्तचे प्रकरण लढले होते. सतीश देशातील प्रसिद्ध आणि महागडे वकील आहेत. 2010च्या रेकॉर्डनुसार ते एका दिवसासाठी जवळपास 10 लाख रुपये मानधन धेतात.
मोफत केस लढवत असल्याची अफवानुकतेच असे दावे केले जात होते की सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानशिंदे ही केस मोफत लढत आहे. एएनआयशी केलेल्या बातचीतमध्ये सतीश मानशिंदे यांनी सांगितले की, मी ही केस मोफत लढणार असल्याचे म्हटलेले नाही. या वृत्तात तथ्य नाही. कोणत्याही प्रकरणासाठी फीस, मी आणि माझ्या क्लायंटमधील मुद्दा आहे.