बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिन्यांहून जास्त काळ उलटून गेला आहे. तरीदेखील अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे कारण समोर आलेले नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला व्हिसेरा रिपोर्ट सोपवण्यात आला आहे. त्यात सुशांतच्या मृत्यू संबंधीत मोठा खुलासा झाला आहे.
आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला दिलेला रिपोर्ट मिळाला आहे. ज्यात मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतला विष देण्यात आले नव्हते. सुशांतच्या व्हिसेरामध्ये विष सापडले नाही. एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतच्या शरीरात कोणतेही ऑर्गेनिक विष सापडले नसल्याचे नमूद केले आहे.
सुशांतच्या कुटुंबाने रियावर केले होते आरोपसुशांतच्या कुटुंबांच्या वकीलांनी सुशांतला मृत्यूपूर्वी विष दिल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र आता एम्सच्या रिपोर्टनुसार हे स्पष्ट झाले आहे की सुशांतला कोणत्याही प्रकारचे विष दिलेले नव्हते. सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या आत्महत्याला हत्या म्हटले होते. सुशांतच्या वडिलांनी रियावर त्यांच्या मुलाला विष दिल्याचा आरोप केला होता.