सुश्मिता सेन. आपल्या शर्थींवर आयुष्य जगणारी दिलखुलास बाई. विश्वसुंदरी. आई. अभिनेत्री. वयाच्या १८ व्या वर्षी ती मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकली. 1994 साली सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. याचवर्षी ती मिस युनिव्हर्स सुद्धा झाली होती.
सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय दोघींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन गोव्यात झाले होते. दोघेही मिस इंडिया होण्याच्या प्रबळ दावेदार होत्या. सुश्मिता स्वत: हे मान्य करत होती की ऐश्वर्या राय तिच्यावर भारी पडू शकते कारण ती खूप सुंदर आहे.
मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय झाला होता. परिक्षकांनी दोघींनाही 9.33 नंबर दिले होते. परंतु, टाय झाल्यामुळे या दोघींना एक-एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांमध्ये सुश्मिताचं उत्तर परिक्षकांना जास्त भावल्यामुळे सुश्मिता १९९४ ची मिस इंडिया ठरली.
"जर तुला पतीच्या चांगल्या गुणाबाबात विचारलं तर तू 'द बोल्ड'मधील Ridge Forrester आणि 'सांता बरबरा'मधील Mason Capwell या दोनपैकी कोणत्या कॅरेक्टर प्राधान्य देशील", असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने 'Mason Capwell' हे उत्तर दिलं होतं. त्यानंतर सुश्मिताला भारताच्या वस्त्रोद्योगाविषयी प्रश्न विचारला गेला होता.
''पोशाखाचा वारसा महात्मा गांधींच्या काळापासून सुरू झाला". या प्रश्नाचे सुश्मिताने दिलेलं उत्तर परिक्षकांना विशेष आवडलं. त्यामुळे या पुरस्कार सुश्मिताच्या नावे करण्यात आला. मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिता सिनेमा आणि बॉलिवूडकडे वळली. सध्या सुष्मिता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. सुश्मिताने 2000 मध्ये रिन्नी आणि 2010 मध्ये अलिशा या दोघींना दत्तक घेतले होते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सुष्मिता सेन नुकतीच आर्याच्या सीझन ३ मध्ये दिसली. गेल्या दोन सीझनप्रमाणे या सीझनमध्येही सुष्मिताने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. याआधी ती 'ताली'मध्ये दिसली होती. यामध्ये तिने एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती.