Sushmita Sen Car: सुष्मिता सेननं खरेदी केली १.९२ कोटींची कार, ब्लॅक लक्झरी कारची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 03:03 PM2023-01-22T15:03:55+5:302023-01-22T15:04:24+5:30
Sushmita Sen Car: बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक सुष्मिता सेन अनेकदा पर्सनल लाईफमधील गोष्टी शेअर करत असते. नुकतीच सुष्मिताने एक महागडी कार विकत घेतली आहे.
माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या आनंदाच्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच सुष्मिता तिच्या नात्याबद्दल खूप चर्चेत होती आणि आता ती तिच्या कारमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेनकडे सेलिब्रेट करण्याचे खूप खास कारण आहे. अखेर सुष्मिताने स्वतःसाठी काहीतरी खास केले आहे. तिने स्वत:साठी एक नवीन मर्सिडीज AMG GLE 53 Coupe खरेदी केली आहे आणि ती स्वत:ला भेट दिली आहे. शनिवारी दुपारी, सुष्मिता सेनने आपल्या या नव्या कारसह काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तसंच याला 'ब्यूटी अँड द बीस्ट.' असे कॅप्शन दिले आहेत.
'#Yourstruly #officialpicture love love love.' असे तिने पुढे लिहिले आहे. यापूर्वी, तिने नवीन कार वापरतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता आणि लिहिले होते. तसेच पोस्टमध्ये #Sharing, #newride #gle53amgcoupe आणि #celebrateyourself हे हॅशटॅगही दिले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.
सुष्मिता सेन सध्या आर्या ३ च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओदेखील शेअर करत आर्या ३ झोन असं लिहिलं होतं.