Join us

सुष्मिता सेनचा भाऊ आणि वहिनी विभक्त होण्याच्या मार्गावर, Charu Asopa ने दिले संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 10:54 AM

मेरे अंगने में फेम अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले.

Charu Asopa-Rajeev Sen Separation: सुष्मिता सेनच्या भावाचे आणि वहिनीचे नातं पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांत इंटरनेटवर राजीव सेन  (Rajeev Sen)  आणि चारू असोपा (Charu Asopa) वेगळे होणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार या कपलने अनेकवेळा दोघांनी आपलं वैवाहिक आयुष्य नीट होण्यासाठी प्रयत्न केलं. पण यावेळी प्रकरण हाताबाहेर गेलं आहे. 

वेगळे होण्यामागे काय आहे कारणमेरे अंगने में फेम अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांनी 2019 मध्ये लग्न बंधनात अडकले.  लग्नाआधी दोघांमध्ये जितके प्रेम होते तितकेच लग्नानंतर खटके उडू लागले. दोघांच्या विचारांमध्ये मोठा फरक असल्याचे बोलं जातेय. त्यामुळे लग्नानंतर दोघांमध्ये प्रत्येक गोष्टीवरून मतभेद सुरू झाले.. घरच्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही समजले नाही.

आता चारूने इन्स्टाग्रामवर रिलेशनशीप संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'लांब राहिल्यामुळे नातं संपत नाही, पण संवाद कमी झाला आणि रिप्लाय उशिरामुळे लागले की नातं तुटू शकते.' घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, चारू असोपाची ही पोस्ट तिचे वैवाहिक आयुष्य अडचणीत असल्याचे संकेत देत आहे. अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्रामवरून राजीवसोबते सगळे फोटो डिलीट केले आहेत. ही पोस्ट खूप काही सांगून जाते.

टॅग्स :सुश्मिता सेन