Join us

सुष्मिता सेन व ललित मोदींच्या रोमान्सवर ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ रोहमन शॉलची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला तो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 4:58 PM

Sushmita Sen's ex-boyfriend Rohman Shaw : सहा महिन्यांआधीपर्यंत सुष्मिता रोहमन शॉलसोबत होती आणि आता ती ललित मोदींसोबत आहे. अनेकांनी यावरून सुष्मिताला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अशात आता रोहमन शॉल याने सुष्मिता व ललित मोदींच्या रिलेशनशिवर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ललित मोदी (Lalit Modi) व सुष्मिता सेन (Sushmita Sen ) या दोघांचं ताजं उदाहरण आपल्या डोळ्यांपुढे आहे. आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान रोहमन शॉल (Rohman Shawl ) याला सोडून आता सुष्मिता आपल्यापेक्षा वयाने 10 वर्षे मोठ्या ललित मोदींच्या प्रेमात पडली आहे. सध्या सोशल मीडियावर सुष्मिता व ललित मोदी यांच्या रिलेशनशिपचीच चर्चा आहे. अनेक जण रोहमन शॉलबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत. सहा महिन्यांआधीपर्यंत सुष्मिता रोहमन शॉलसोबत होती आणि आता ती ललित मोदींसोबत आहे. अनेकांनी यावरून सुष्मिताला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अशात आता रोहमन शॉल याने सुष्मिता व ललित मोदींच्या रिलेशनशिवर प्रतिक्रिया दिली आहे.

काल ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, आपलं नातं जगजाहिर केलं होतं. अद्याप सुष्मिता यावर बोललेली नाही. पण तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड रोहमनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला रोहमन?‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत रोहमन सुष्मिताच्या नव्या नात्याबद्दल बोलला. ‘तिला आनंदी राहू द्या. प्रेम ही अत्यंत सुंदर भावना आहे. मला फक्त एवढंच ठाऊक आहे की, तिने एखाद्याची निवड केली असेल तर नक्कीच तो तिच्या लायक आहे,’ असं तो म्हणाला. याशिवाय रोहमनने इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. ‘किसी पर हंसने से अगर सुकून मिल जाये तो हंस लेना, क्योंकि परेशान वो नहीं तुम हो...,’ असं त्याने लिहिलं आहे.

सुष्मिता व रोहमन यांनी 2018 साली एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. 23 डिसेंबर 2021 रोजी दोघांचं ब्रेकअप झालं. अर्थात अद्यापही दोघं चांगले मित्र आहेत. ललित मोदींची सुष्मिताच्या आयुष्यात एन्ट्री झाल्यावर ही मैत्री आणखी किती काळ टिकते, ते बघूच.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉलललित मोदी