सुश्मिता सेन फिटनेसची अतिशय काळजी घेते. तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. पण एकेकाळी हिच सुश्मिता इतकी आजारी पडली की, जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी तिला स्टेरॉइड घ्यावे लागायचे. सुश्मिताने एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला.२०१४ मध्ये सुश्मिता गंभीर आजारी झाली. तिने सांगितले की,२०१४ साली ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि अचानक मी आजारी पडले. मला काय होतंय हे कुणालाच कळेना.
एक दिवस मीअचानक बेशुद्ध पडले. यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर काही तपासण्या करण्यात आल्या आणि यादरम्यान माझ्च्या अॅड्रेनल ग्लॅण्ड्स (Adrenal Glands) या ग्रंथींमधील कोर्टिसोल (Cortisol) नावाचे हार्मोन्स तयार होणे बंद झाल्याचे मला कळले. त्यामुळे हळूहळू माझ्या शरीरातील अवयव निकामी होऊ लागले होते. यातून वाचण्यासाठी एकच पर्याय होता. तो म्हणजे,दर आठ तासांनी hydrocortisone हे स्टेरॉइड घेण्याचा.
मी उपचारासाठी लंडन, जर्मनीला गेले. त्याकाळात मी या आजाराशी लढण्याचा निर्धार केला. कारण मला एक आजारपणं घेऊन मरायचे नव्हते. मी योगसाधना सुरु केली. शरीरावर प्रचंड मेहनत घेतली. २०१६च्या अखेरिस माझी स्थिती बिघडली होती. मला अबुधाबीच्या एका रूग्णालयात नेले गेले. पुन्हा टेस्ट झाल्यात. पण मी परतत असताना आता मला स्टेरॉइड घ्यायची गरज नाही, असे मला सांगण्यात आले. कारण माझ्या शरीरात कोर्टिसोल बनणे सुरु झाले होते. हे ऐकून मी स्तब्ध झाले. मी त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आले.