Join us

Lalit Modiसोबत Sushmita Sen गुपचूप साखरपुडा?, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केली एंगेजमेंट रिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:54 IST

सध्या सगळीकडे ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या लव्ह लाईफची सर्वत्र चर्चा आहे.अभिनेत्रीच्या हातातील रिंग बघून तिने गुपचूप साखरपुडा उरकला अशी जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)  पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा केली आहे. येथे ललित मोदींनी त्यांचे आणि सुष्मिता सेनचे नाते उघडले आणि सोशल मीडियावर बातम्या आणि मीम्सचा पूर आला आहे.सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्याबद्दल खूप वाचलं असेल. पण अभिनेत्रीच्या एंगेजमेंट रिंगकडे क्वचितच कोणी लक्ष दिले असेल.  

बिझनेसमॅन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी (Lalit Modi ) सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतचे रोमाँटिक फोटो शेअर केलेत. ललित मोदींनीही सुष्मितासोबतचा आपला ट्विटर डीपी पोस्ट केला आहे. आता फक्त ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या लव्ह लाईफची सर्वत्र चर्चा आहे. ललित मोदी यांनी गुरुवारी दोन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की,''मालदिव येथून कुुटुंबीयांसोबत पिकनिकवरून नुकताच लंडनला परतलो. हो एक सांगायचंय सुश्मिता सेन ही आता माझी बेटर हाफ आहे. ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे.'' त्यांच्या पहिल्या ट्विटने या दोघांनी लग्न केलं असा सर्वांचा समज झाला, पण सात मिनिटांत त्यांनी दुसरं ट्विट करून लग्न केले नसल्याचे स्पष्ट करताना आम्ही एकमेकांना डेट करतोय, असे सांगितले.

या सर्व बातम्यांदरम्यान सुष्मिता आणि ललित मोदी यांचा एक फोटोही दिसला, ज्यामध्ये अभिनेत्रीने एंगेजमेंट रिंग घातलेली दिसली.  सुष्मिता ललित मोदींच्या शेजारी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बसून हसताना दिसत आहे. अभिनेत्री फोटोमध्ये एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसतेय. यावरून तिने गुपचुप साखरपुडा उरकून घेतला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये कधी तथ्य आहे हे सुष्मिता आणि ललित मोदीच सांगू शकतात.  

टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदी