Join us

तो बदलणार नाही आणि ती...! सुश्मिता सेन व रोहमन शॉल यांच्यात काही बिनसले तर नाही? पोस्ट वाचून चाहते कन्फ्युज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 11:23 AM

सुश्मिताने अशी काही पोस्ट केली की, ती वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. चाहते गोंधळून गेलेत.

ठळक मुद्दे2018 साली शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत सुश्मिता व रोहमन यांनी हातात हात घालून पोज दिल्या होत्या. यानंतर काही महिन्यांनी दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती.

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल यांची लव्हस्टोरी जगापासून लपलेली नाही. सोशल मीडियावर तर दोघांच्या लव्हस्टोरीचे अनेक पुरावे मिळतील. सुश आणि रोहमन दोघेही एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण आता सुश्मिताने अशी काही पोस्ट केली की, ती वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. चाहते गोंधळून गेलेत. सुश्मिता आणि रोहमन यांच्यात काही बिनसले तर नाही ना, अशी शंका चाहत्यांनी बोलून दाखवली.

‘अडचण ही आहे की, बायकांना वाटते, तो बदलेल. पण तो बदलणार नाहीच. ती कधीच आपल्याला सोडून जाणार नाही, हे समजण्याची चूक पुरूष करून बसतात. पण ती सोडून जाऊ शकते,’ अशा आशयाची पोस्ट सुश्मिताने शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने दिलेले कॅप्शनही कन्फ्युज करणारे आहे. ‘कहाणीचा मतितार्थ हाच की, तो नाही बदलणार आणि ती निघून जाईल,’ असे तिने लिहिले आहे.

सुश्मिताची ही पोस्ट वाचून चाहत्यांनी वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. अनेकांना सुश्मिता व रोहमन यांच्यात काहीतरी बिनसल्याचे वाटतेय. मी आशा करतो की, तुझे तुझ्या पार्टनरसोबत सगळे काही ठीक असेन, असे एका युजरने लिहिले आहे. तर अन्य एकाने आशा करतो तुम्ही एकमेकांपासून दूर जाणार नाही, अशी भावना व्यक्त केली आहे.

2018 साली शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत सुश्मिता व रोहमन यांनी हातात हात घालून पोज दिल्या होत्या. यानंतर काही महिन्यांनी दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. रोहमन व सुश्मिता दोघेही लग्न करणार अशीही चर्चा होतीच.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल