बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या मॉडेल रोहमन शॉल याच्या प्रेमात आकंठ बुडालीय. गेल्या काही महिन्यांत दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही दोघांच्या प्रेमाला बहर आला आहे. एकंदर काय तर हे प्रेम कुणापासूनही लपून राहिलेले नाही. आता सुश्मिताने आपल्या बॉयफे्रन्डचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत रोहमन काऊचवर बसलेला आहे.
या फोटोला सुश्मिताने दिलेले कॅप्शन बरेच काही सांगणारे आहे. होय, सुश्मिताने या फोटोला गर्भित कॅप्शन दिले आहे. ‘जेव्हा आपण भूतकाळ व भविष्यकाळ सोडून देतो तेव्हा आपल्यासमोर वर्तमानकाळ असतो. मला दिसतेय की, तू मलाचं शोधत आहेत...’, असे सुश्मिताने लिहिले आहे. या कॅप्शननंतर सुश्मिता रोहमनमध्ये किती गुंतलीय, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
अलीकडे फॅशन शो, एअरपोर्ट, दिवाळी पार्टी अशा सगळ्या ठिकाणी सुश्मिता सेन दिसली आणि या सगळ्याठिकाणी तिचा बायॅफे्रन्ड रोहमन शॉल हजर होता. सध्या सुश्मिता रोहमनच्या हातात हात घालून फिरतेय. साहजिकचं दोघांच्या लग्नाच्या चचार्ही सुरू झाल्या आहेत. दोन दत्तक मुलींची आई असलेली सुश्मिता नववर्षात रोहमनसोबत लग्न करणार असे मानले जात आहेत. अर्थात लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सुश म्हणतेय. पण एकीकडे ती लग्नाची शक्यता नाकारत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट लग्नाचे संकेत देत आहेत. काल-परवा सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. यात पोस्टमधील फोटोत सुश्मिताच्या होता तिच्या आईच्या लग्नातील बांगड्या आहेत.
‘माझ्या आईच्या लग्नातील बांगड्या,’ असे तिने या फोटोवर लिहिले आहे. सोबत हार्ट इमोजी आहे. सुश्मिताची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. सुश लवकरच लग्न करणार, हे सांगण्यासाठी ही पोस्ट पुरेशी आहे.