बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या बिझनेसमॅन ललित मोदींना ( Lalit Modi) डेट करतेय. होय, सुष्मिता स्वत:पेक्षा 10 वर्षांनी मोठ्या ललित मोदींच्या प्रेमात पडली आहे. गेल्या 14 जुलैला दोघांच्या नात्याचा खुलासा झाला होता. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, हे नातं जगजाहिर केलं होतं. पण यानंतर अनेकांनी सुष्मिता व ललित मोदींच्या नात्याची खिल्ली उडवायला सुरू केली. अनेकांनी सुष्मिताला ‘गोल्ड डिगर’ (संधीसाधू) म्हणत, ती पैशांसाठी ललित मोदींच्या प्रेमात पडल्याचा आरोप केला. आता या ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिताने सडेतोड उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत तिने ट्रोलर्सला सुनावलं आहे. (Sushmita Sen Slams Haters)
काय म्हणाली सुष्मिता...
माझं अस्तित्व आणि अंतरात्मा पूर्णपणे केंद्रीत आहे. सर्व सृष्टी आपल्यात विलीन करून निसर्ग नेहमी एकतेचा अनुभव देतो आणि जेव्हा आपण हा समतोल बिघडतो, तेव्हा आपण विभाजीत होतो. आपल्या आजुबाजूचं जग किती दयनीय अवस्थेत, किती दु:खी आहे, हे पाहून वाईट वाटतं. तथाकथित बुद्धिजीवी लोक, अतिशय खालच्या दर्जाचे गॉसिप्स करणारे अज्ञानी, मला कधीही न भेटलेले आणि ज्यांनी मी ओळखतही नाही असे लोक माझं आयुष्य आणि माझ्या चारित्र्याबद्दल काय काय बोलत आहेत. मला गोल्ड डिगर म्हणत आहेत. पण मी सांगू इच्छिते की, मी सोन्याच्या पुढचा विचार करते. मी नेहमी हिरे शोधते आणि हो, हिरे मी स्वत: स्वत:साठी खरेदी करते. माझ्या शुभचिंतकांचे मी आभार मानते. तुमची सुश पूर्णपणे बरी आहे. कारण ती कधीच इतरांची परवानगी घेत वा टाळ्यांच्या क्षणिक कडकडाटावर जगली नाही. मी सूर्य आहे.. जो नेहमी त्याच्या अस्तित्वासाठी चमकतो..., अशी पोस्ट सुष्मिताने शेअर केली आहे.
ती पैशांसाठी विकली गेली का?काल बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सुष्मिताच्या ललित मोदींसोबतच्या नात्यावर भाष्य करत एक पोस्ट शेअर केली होती. ‘आता सुष्मितान अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या का कुरूप माणसासोबत वेळ घालवते आहे. का? कारण तो श्रीमंत आहे? काय ती पैशांसाठी विकली गेली? कदाचित त्या माणसावर तिचं खरंच प्रेम असावं. पण ती खरंच त्याच्या प्रेमात आहे, यावर विश्वास बसत नाही. ज्यांना पैशांसाठी प्रेम होतं, ते माझ्या नजरेतून तेवढ्याच लवकर उतरतात...,’ अशी पोस्ट तस्लिमा यांनी शेअर केली होती.