आपल्या आजूबाजूला असंख्य घडामोडी घडत असतात. कधी आपल्या लक्षात येतात तर कधी नाही. कारण आपल्याला त्याचे भान असतेच असे नाही. त्या घटनांकडे बघण्याचेही बरेच दृष्टीकोन असतात बरं. कोणी बघून सोडून देतं तर कोणी त्याकडे सिरीयसली बघतं. तर कोणी ते विविध कलांमधून समाजासमोर आणतं. अशाच काही समाजातील घडामोडींवर विनोदात्मक पद्धतीन भाष्य करणारं शुभानन आर्टस निर्मित व प्रवीण शांताराम लिखित सस्पेन्स थ्रिलर ‘कट टू कट’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. या नाटकात दिगंबर नाईक यांची प्रमुख भूमिका आहे. पण हे नाटक मालवणी नाही, तर शुद्ध मराठी आहे. दिगंबर नाईक यांनी या नाटकात एका स्त्री भूमिकेसह पाच विविध भूमिका साकारल्या आहेत. सोबत सविता हांडे, मयूर पवार, सुरेश चव्हाण, तृषाली चव्हाण, कमलाकर बागवे, हरिष मयेकर व प्रभाकर मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन प्रभाकर मोरे यांनी केले आहे. या नाटकाचे नेपथ्य अंकुश कांबळी, प्रकाश योजना योगेश केळकर, वेशभूषा रुचिता पाटणकर व संगीत अमीर हडकर यांचे आहे.
सस्पेन्स विनोदी नाटक ‘कट टू कट’
By admin | Published: November 23, 2015 1:40 AM