Join us

ट्रॅफिक सिग्नलमुळे सुरु झाली हृतिकची Lovestory; पहिल्या डेटवर सुझानने भरलं होतं हृतिकचं बील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 15:36 IST

Hrithik roshan: 2000 साली लग्नगाठ बांधलेल्या या जोडीने १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. मात्र, आजही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगते.

ठळक मुद्देकाही कारणास्तव त्यांनी १३ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी तुफान गाजली. यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan) आणि सुझान खान (Sussane Khan). 2000 साली लग्नगाठ बांधलेल्या या जोडीने १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. मात्र, आजही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगते. आज सुझानचा वाढदिवस. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या आणि हृतिकच्या पहिल्या भेटीची आणि लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी हे दोघं पहिल्यांदा डेटवर गेले होते. त्यावेळी सुझानने हॉटेलचं बील भरलं होतं. 

एका मुलाखतीमध्ये हृतिकने सुझानसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला होता. "आमची पहिली भेट एका सिग्नलवर झाली होती. आम्ही दोघंही आपआपल्या गाडीत होतो आणि ट्रॅफिक जाम झालं होतं. सुझानची कार माझ्या कारजवळच उभी होती. त्यावेळी माझी नजर तिच्यावर पडली आणि त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही दोघंही एका लग्नात भेटलो. त्यानंतर एक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर आपण लग्न करावं असा विचार हृतिकच्या मनात आला आणि त्याने सुझानला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर जवळपास ४ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला." दरम्यान, या मुलाखतीत बोलत असताना, "आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा डेटवर गेलो होतो. त्यावेळी सुझाननेच रेस्टॉरंटचं बील दिलं होतं". विशेष म्हणजे ही जोडी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जायची. मात्र, काही कारणास्तव त्यांनी १३ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.सूत्रांच्या माहितीनुसार, या दोघांच्या घटस्फोटामागे अभिनेत्री कंगना रणौत जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खानबॉलिवूडसेलिब्रिटी