कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे. या व्हायरसचे थैमान रोखण्यासाठी सरकार लॉकडाऊन व सोशल डिस्टेंसिंगसारखे नियम लागू केलेत. तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर हळूहळू सगळे काही अनलॉक होताना दिसतेय. अर्थात तरीही कोरोनाची धास्ती कायम आहे. यासाठी सतर्कता गरजेची आहे. हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिने किती सतर्कता बाळगावी तर अख्खे सलून खाली करण्याइतकी.होय, सुजैन 4 महिन्यानंतर सलूनमध्ये पोहोचली. सतर्कतेपोटी तिच्यासाठी अख्खे सलून खाली करण्यात आले. सुजैन बुधवारी हेअर कट व हेअर स्पा घेण्यासाठी सलूनमध्ये पोहोचली. पण त्याआधी तिने अख्खे सलून खाली करवले. होय, म्हणजे, तिने एकटीसाठी अख्खे सलून बुक केले.
सुजैनने सलूनमधला फोटो शेअर करत स्वत: ही माहिती दिली. ‘4 महिन्यानंतर अखेर हेअर कट व ट्रिटमेंट स्पाचा दिवस आला. त्यांनी संपूर्ण सलून माझ्यासाठी खाली केले. पाहून आनंद झाला. या फन टाइमसाठी खूप खूप आभार, ’ असे सुजैनने हा फोटो शेअर करताना लिहिले.
सुजैन सलूनमधून बाहेर पडल्यावर मीडियाचे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. यावेळी तिच्या चेह-यावर मास्क आणि शील्ड होते. मीडियाच्या फोटोग्राफर्सलाही दूर राहा, असे सांगताना ती दिसली.
सुजैन व हृतिकचा घटस्फोट झालाय. पण लॉकडाऊनपासून सुजैन हृतिकच्या घरी राहतेय. मुलांसाठी तिने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात माझ्या दोन्ही मुलांना आई व बाबा दोघांची गरज आहे. अशावेळी मी त्यांना एकटे सोडू शकत नाही. लॉकडाऊन आहे तोपर्यंत मी माझ्या मुलांसोबतच राहणार असे सुजैनने म्हटले होते.