हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता. अलीकडे पिंकविला या एंटरटेनमेंट पोर्टलशी बोलताना खुद्द सुनैना हिनेही रंगोलीचा हा आरोप खरा असल्याचे सांगितले . माझे एका मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे आणि यामुळे माझा छळ सुरु आहे. माझ्या कुटुंबाने केवळ माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा. जेणेकरून माझे आयुष्य पुन्हा सुंदर होईल, असे सुनैनाने यावेळी स्पष्ट केले.
रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ! सुनैनाबद्दल बोलली हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:25 AM
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता.
ठळक मुद्दे सुनैनाचा फोन लागत नाहीये. सुनैनाच्या कुटुंबाने तिच्यासोबत काय केले, देवच जाणो. मी सध्या खूप घाबरलेली आहे, असे ट्विट रंगोलीने केले.