Join us

रणबीरच्या 'त्या' डायलॉगवर भडकले स्वानंद किरकिरे, म्हणाले, "भारतीय सिनेमा शरमेने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 2:03 PM

रश्मिकाला पडद्यावर मारहाण होत असताना मुली टाळ्या वाजवत होत्या.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'Animal सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. बाप मुलाच्या ताणलेल्या नात्यावर आधारित या सिनेमात प्रचंड हिंसा, रक्तपात दाखवण्यात आला आहे. सिनेमाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. कबीर सिंह प्रमाणेच हाही सिनेमा अनेकांना आवडला नसल्याची प्रतिक्रिया येत आहे. लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire) यांनी सोशल मीडियावरुन सिनेमावर टीका केली आहे. 

स्वानंद किरकिरे यांनी Animal वर टीका करताना लिहिले, "महबूब खान यांचा 'औरत' सिनेमा, गुरुदत्त यांचा 'साहब बीवी और गुलाम', हृषिकेश मुखर्जी यांचा 'अनुपमा', श्याम बेनेगल यांचा 'अंकुर और भूमिका', केतन मेहता यांचा 'मिर्च मसाला', सुधीर मिश्रा यांचा 'मै जिंदा हूँ', गौरी शिंदेचा 'इंग्लिश विंग्लिश', बहल यांचा 'क्वीन', सुजित सरकार यांचा 'पीकू', असे अनेक भारतीय सिनेमे आहेत ज्यांनी मला स्त्रीचा आदर कसा करावा ही शिकवण दिली. सगळं समजत असतानाही वर्षानुवर्ष जुन्या या विचारात कितीतरी अभाव आहे. मला नाही माहित मी यशस्वी झालो की नाही पण आजही मी सतत स्वत:मध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करत असतो. हे सर्व सिनेमांमुळेच.'

ते पुढे लिहितात, 'पण आज अॅनिमल सिनेमा बघून मला खरोखरंच आजच्या पिढीतील स्त्रियांची दया येते. तुमच्यासमोर पुन्हा एक नवा पुरुष आला आहे जो जास्त भयावह आहे. जो तुमचा आदर करणार नाही आणि तुमच्यावर सतत दबाव घालेल, तुम्हाला झुकायला लावेल आणि याचा त्याला अभिमानही वाटेल असा तो पुरुष आहे. यातच त्याची पुरुषार्थता आहे. पडद्यावर रश्मिकाला मारहाण होत असलेला सीन बघून आजच्या मुली टाळ्या वाजवत होत्या हे बघून मी मनातल्या मनातच समतेच्या विचारांना श्रद्धांजली दिली. मी हताश, निराश आणि दुर्बल होऊन घरी आलो आहे. रणबीरचा तो डायलॉग जो अल्फा मेल चा अर्थ समजावून सांगतो आणि म्हणतो, जो पुरुष अल्फा बनू शकत नाही तो स्त्रीचा उपभोग घेण्यासाठी कवी बनतो आणि चंद्र तारे तोडण्याची वचनं द्यायला लागतो. मी एक कवी आहे. जगण्यासाठी कविता करतो. माझी काय जागा आहे? एक फिल्म खूप पैसे कमावत आहेआणि भारतीय सिनेमाचा गौरवशाली इतिहास शरमेने मान खाली घालत आहे. मला वाटतं हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या भविष्याला नवी कलाटणी देत आहे एक भयानक खतरनाक दिशेने नेत आहे.'

टॅग्स :स्वानंद किरकिरेरणबीर कपूरसिनेमा