Join us

रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर लक्ष्याची लेक स्वानंदीने व्यक्त केलं दु:ख, शेअर केला शेवटचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:08 PM

स्वानंदी बेर्डेने काका रवींद्र बेर्डेंसोबतचा शेवटचा फोटो शेअर केला आहे.

मराठी सिनेसृ्ष्टीतील विनोदवीर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं आज निधन जालं. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काकांच्या निधनाने लक्ष्मीकांतची लेक स्वानंदी बेर्डेने (Swanandi Berde) दु:ख व्यक्त केलंय. तिने काका रवींद्र यांच्यासोबतचा शेवटचा फोटो शेअर केला आहे. फोटोत अभिनय बेर्डेही दिसत आहे.

स्वानंदी बेर्डेने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. रवींद्र बेर्डे यांना श्वसनाचा त्रास असल्याचं या फोटोतून स्पष्ट दिसून येतं. तसंच  त्यांची तब्येत खालावलेलीही दिसून येते. अभिनय आणि स्वानंदी त्यांची नातवंडं मागे उभी असून काकांसोबत एक फोटो कॅमेऱ्यात कैद करत आहेत. स्वानंदीने या फोटोसोबत हार्टब्रेक चं इमोजी पोस्ट केलं आहे. 

रवींद्र बेर्डे यांना 2011 साली घशाचा कॅन्सर झाला. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. तर दोनच दिवसांपूर्वी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तरी पुन्हा तब्येत खालावल्याने त्यांनी घरीच शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, नातवंडं असा परिवार आहे. 

 वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि १९६५ च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक, अष्टरूप जय वैभवलक्ष्मी माता, होऊन जाउदे, हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, बकाल, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा अशा गाजलेल्या मराठी सिनेमांसोबत त्यांनी सिंघमसारख्या सुपरहिट हिंदी सिनेमातही अभिनय केला आहे.

टॅग्स :स्वानंदी बेर्डेमराठी अभिनेतामृत्यूलक्ष्मीकांत बेर्डे