Join us

आईचे प्राण वाचवण्यासाठी स्वप्नील जोशीचा पायीप्रवास; अभिनेत्याच्या आईने सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 1:41 PM

Swapnil joshi: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वप्नीलच्या 'भिकारी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी (swapnil joshi).उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण करणारा स्वप्नील आज गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो.  त्यामुळे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनयावर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलचं त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम असून अलिकडेच त्याच्या आईने एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर स्वप्नील आणि त्याच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या आईने स्वप्नील आपल्यावर किती प्रेम करतो आणि आई-वडिलांसाठी तो काय करु शकतो हे सांगितलं आहे. हे सांगत असताना त्यांनी त्यांना आलेल्या हार्ट अटॅकचा किस्सा सांगितला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ स्वप्नीलच्या 'भिकारी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळचा आहे. हा व्हिडीओ स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वप्नील जोशीच्या 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना - भिकारी' या चित्रपटाला पाच वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला.

''मला २००६ साली  हार्ट अटॅक आला होता. तेव्हा स्वप्नीलने माझी आई  ठणठणीत  होऊ दे म्हणून सिद्धिविनायकाकडे साकडं घातलं होतं.माझी आई बरी झाली तर गिरगावपासून सिद्धिविनायकाला ११ वेळा चालत येईन असं साकडं घातलं होतं. त्यानंतर मी पूर्णपणे बरी झाले आणि स्वप्नीलने त्याचं साकडं पूर्ण केलं'', असं स्वप्नीलची आई म्हणाली. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.दरम्यान,स्वप्नीलचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असून तो कायम सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. 

टॅग्स :स्वप्निल जोशीसेलिब्रिटीसिनेमा