काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला हर हर महादेव आणि लवकरच रिलीज होणारा वेडात मराठे वीर दौडले सात हे ऐतिहासिक चित्रपट सातत्याने चर्चेत येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन वादही निर्माण झाले आहेत. नुकतेच या प्रकरणावर अभिनेता स्वप्निल जोशीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता स्वप्निल जोशी याने ट्विटरवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतले. यावेळी चाहत्यांची विचारलेल्या प्रश्नांची स्वप्निलने उत्तरे दिली. यावेळी त्याला एका चाहत्याने मराठी ऐतिहासिक चित्रपटांबद्दल विचारले. मराठीत होणारे कॉन्ट्रोव्हर्सीमुळे इतिहासावर आधारीत चित्रपट आगामी काळात कमी होतील का? निर्माते यापासून दूर होईल अशी लोकांना भीती आहे ? मागे ठाण्यात प्रेक्षकांसोबत झाल्यानंतर मराठी कलाकार फार गप्प का होते ? असे प्रश्न स्वप्निल जोशीला विचारण्यात आले. त्यावर स्वप्निल जोशी म्हणाला की, वादात पडणं हे माझ्या डीएनएमध्ये नाही. म्हणून ते आवडत नाही. त्याचे हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे.