Join us  

स्वप्निल मेट मेरी कॉम

By admin | Published: May 07, 2016 4:26 AM

प्रियांका चोप्राने मेरी कॉमच्या आयुष्यावरील चित्रपटामध्ये अप्रतिम आभिनय करून सर्वांचीच वाहवा मिळविली होती. बॉलिवूडमध्ये मेरी कॉम या चित्रपटाची प्रशंसा

प्रियांका चोप्राने मेरी कॉमच्या आयुष्यावरील चित्रपटामध्ये अप्रतिम आभिनय करून सर्वांचीच वाहवा मिळविली होती. बॉलिवूडमध्ये मेरी कॉम या चित्रपटाची प्रशंसा तर झालीच; परंत या सिनेमाला अनेक अ‍ॅवॉर्ड्सदेखील मिळाले आहेत. नुकताच मराठी इंडस्ट्रीचा आपला हँडसम हंक स्वप्निल जोशी हादेखील बॉक्सर मेरी कॉमला भेटला. आता स्वप्निल मेरी कॉमला का भेटला, असा प्रश्न तर त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल ना. कोणत्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने तर ही भेट नसेल ना, असे वाटत असेल, तर तसे बिलकूल नाही.स्वप्निल अन् मेरीची ही भेट एकदम अनप्लॅन्ड होती. या भेटीसंदर्भात स्नप्निलने ‘सीएनएक्स’कडे खुलासा केला. स्वप्निल म्हणाला, मी शूटिंगसाठी पुण्यातील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर मला अचानक मेरी कॉम भेटल्या. मी त्यांना सांगितले, मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तर त्यादेखील मला म्हणाल्या, हो मीसुद्धा तुमची फॅन आहे आणि तुम्ही केलेला कृष्णा मी पाहिलाय. ही अशी अचानक, पण एकदम मस्त आमची भेट झाली.