ठळक मुद्देस्वराने या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय, भोपाळ, दिल्ली, राजस्थान अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार केला.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांचा प्रचार केला. पण या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अर्थात याऊपरही स्वराचा ‘जोश’ मावळलेला नाही. सोशल मीडियावर भाजपाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर तिने अनेक ट्वीट केले आहेत.कालच स्वराने पीएम मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
‘वैचारिक आणि अन्य काही मुद्यांवर मतभेद असतानाही मी नरेंद्र मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा देते. मोदी देशातील सगळ्यांना सोबत घेऊन चालतील, अशी आशा करते,’ असे ट्वीट तिने केले. यानंतरच्या ट्वीटमध्ये मात्र तिने साध्वी प्रजा यांना लक्ष्य केले.
‘भारतात एक नवी सुरुवात. पहिल्यांदा आपण दहशतवादी प्रकरणातील एका संशयितास संसदेत पाठवत आहोत. आता पाकिस्तानची खबर कशी घेणार???’, अशा शब्दांत तिने साध्वी प्राची यांच्यावर निशाणा साधला.
तूर्तास स्वराचे हे ट्वीट प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. स्वराने या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय, भोपाळ, दिल्ली, राजस्थान अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार केला. स्वराही भाजपा विरोधक मानली जाते. अशात काल मतमोजणीदरम्यान भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू होताच, अनेकांनी स्वराला ट्रोल करणे सुुरू केले होते. सोशल मीडियावर स्वराची खिल्ली उडवणाऱ्या अनेक ट्वीटचा पूर आला होता. कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? असे एका युजरने लिहिले होते. तर अन्य एका युजर ‘अनारकली ऊर्फ स्वरा भास्कर उठो, ईव्हीएम पे रोने का वक्त आ गया है,’असे लिहिले होते. अनेक युजर्सनी स्वराला डिवचत,कहा हो, असा प्रश्न केला आहे. क्या स्वरा भास्कर ये सब झेल पायेगी, असे ट्वीट एका युजरने केले होते.