Join us

स्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे, काय आहे कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:51 PM

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार आणि उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मला घेऊन सिनेमा करायची वेळ येणार नाही असे स्वराने सांगितले आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चौकटीबाहेरच्या भूमिकांना तितक्याच ताकदीने न्याय देणारी अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली आहे. वीरे दी वेडिंग, नील बटे सन्नाटा, रांझणा अशा विविध हिंदी सिनेमात स्वराने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हिंदी भाषेवर प्रभूत्व असणारी स्वरा आता मराठी भाषेचे धडे घेत आहे. हे वाचून तुम्हाला वाटेल की ती लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहे की काय? मात्र तुमच्या या प्रश्नाचे उत्तर खुद्द स्वरानेच दिले आहे. मराठी सिनेमासाठी मराठी भाषेचे धडे घेत नसल्याचे तिने सांगितले आहे.

मात्र मराठी सिनेमात काम करायची संधी मिळाली तर काम करणार का असं विचारलं असता स्वराने होकारार्थी उत्तर दिलं आहे. नक्कीच मराठीत काम करायला आवडेल असं तिने नमूद केले आहे. मात्र मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांना चित्रपटसृष्टीबाहेरच्या माझ्यासारख्या व्यक्तीची गरज लागणार नाही. कारण मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार आणि उत्तम कलाकार आहेत. त्यामुळे मराठी दिग्दर्शकांना मला घेऊन सिनेमा करायची वेळ येणार नाही असे स्वराने सांगितले आहे.

केवळ माझा विचार करून कोणी विचार करत असेल तर आणि तरच मला मराठी सिनेमात संधी मिळू शकते अन्यथा मराठी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत असं स्वराने सांगितले आहे. मराठी चित्रपटसृष्टीची जशी दिवसेंदिवस प्रगती होत आहे ते पाहूनही स्वरा भारावली आहे. मराठी सिनेमाच्या कथेतील ताकद आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय यामुळे मराठी सिनेमा नव्या उंचीवर पोहोचला आहे असे स्वराने नमूद केले आहे. केवळ मराठी सिनेमाच नाही तर मराठी साहित्यसुद्धा स्वराला भावते. साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या साहित्यिक संपदा स्वराला आवडते. . 

टॅग्स :स्वरा भास्कर