अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वरा कंगनाचं उदाहरण देत म्हणाली की, हे गरजेचं नाही की, एक चांगला कलाकार आपल्या जीवनात एक चांगला माणूसही असेल. याआधीही स्वराने कंगनाच्या शेतकरी आंदोलनावरील वक्तव्यांचा निषेध केला होता.
स्वराला मुलाखतीत विचारलं गेलं की, काय कंगना 'एका चांगला कलाकार एक चांगला माणूस असतो' या स्टेटमेंटच्या उलट आहे? या प्रश्नावर स्वरा म्हणाली की, माझ्या विचाराने केवळ एकट्या कंगनाचंच या स्टेटमेंटसोबत काही देणं-घेणं नाही. आधीही आमच्यात बराच वाद झाला. पण मला वाटतं की, आपण या स्टेटमेंटवर पुन्हा विचार करणं गरजेचं आहे. (हृतिक रोशनची केस क्राइम ब्रॅंचला ट्रान्सफर, कंगना म्हणाली - छोट्याशा अफेअरसाठी किती रडणार?)
स्वरा पुढे म्हणाली की, 'आपण अनेकदा ही चूक करतो. कारण एखाद्या अभिनेत्याने पडद्यावर एका चांगल्या व्यक्तीची किंवा हिरोइक भूमिका साकारलेली असते. त्यामुळेच खऱ्या आयुष्यात ती व्यक्ती तशीच असेल असा विचार करण्याची चूक करतो. भूमिका चांगली साकारण्याचा अर्थ आहे की, त्या अभिनेत्यात टॅलेंट आहे. तो त्याच्या कामात चांगला आहे. पण हे गरजेचं नाही की, ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही चांगली व्यक्ती असेल'.
स्वरा म्हणाली की, अभिनय हा एखाद्या दुसऱ्या प्रोफेशनसारखाच आहे. जसे डॉक्टर, इंजिनिअर किंवा टीचर आपल्या कामात बेस्ट असतात. पण ते चांगले व्यक्ती असतीलच हे गरजेचं नाही. कलाकारांसोबतही असंच आहे. स्वराने उदाहरण देताना सांगितले की, जशी मी एका रायटरची मोठी फॅन आहे. तो एक महान रायटर आहे, पण तो मला आतापर्यंत भेटणाऱ्या लोकाच सर्वात वाईटही आहे. तुम्ही एक चांगले डान्सर, गायक, अभिनेते, लेकख होऊ शकता. पण हे गरजेचं नाही की, हे तुमच्या पर्सनॅलिटीमध्येही दिसावं.