Join us

मला ट्रोल करण्याऐवजी काम करा...! स्वरा भास्करने आयपीएस अधिका-याला सुनावले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 3:52 PM

स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. प्रत्येक मुद्यावर अगदी परखड मत मांडणारी स्वरा यामुळे अनेकदा ट्रोलही झालीय. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल ती स्वरा कुठली.

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वराने कन्हैया कुमारचा प्रचार केला होता. कन्हैय्या कुमारच्या पराभवानंतर स्वरा प्रचंड ट्रोल झाली होती.

स्वरा भास्कर चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहते. प्रत्येक मुद्यावर अगदी परखड मत मांडणारी स्वरा यामुळे अनेकदा ट्रोलही झालीय. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल ती स्वरा कुठली. नुकतीच स्वरा विदेशातून परतली आणि परतल्या परतल्या सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाली. झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या तबरेज अन्सारीच्या प्रकरणावर तिने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. तबरेज अन्सारी याने चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने त्याला गेल्या १९ जून रोजी सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली होती. २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता. अन्सारी याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले होते. या संपूर्ण प्रकरणावर स्वराने जळजळीत प्रतिक्रिया नोंदवली. साहजिकच यानंतर ती ट्रोल झाली.

एका आयपीएस अधिका-याने स्वराच्या ट्वीटला रिप्लाय केला. ‘तू तुझ्या सवडीने मुद्दे निवडले, हे तू सिद्ध केलेस,’असे या आयपीएस अधिका-याने स्वराला उद्देशून लिहिले. स्वराने या आयपीएस अधिका-याला जशास तसे उत्तर दिले.

 

‘सर मी अभिनेत्री आहे. त्यामुळे कुठल्याही विषयावर सिलेक्टीव्ह असल्या-नसल्याने कुठलाही फरक पडणार नाही. पण तुम्ही एक आयपीएस अधिकारी आहात. तुमचे सिलेक्टिव्ह असणे देशाला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे मला ट्रोल करण्याऐवजी स्वत:चे काम करा. किमान ज्या भारतीय संविधानाची शपथ घेतली, त्याच्यासाठी तरी आवाज उठवा’ असे तिने लिहिले. हे ट्वीट करताना स्वराने ‘हॅशटॅग वेकअप’चा वापर केला.अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वराने कन्हैया कुमारचा प्रचार केला होता. कन्हैय्या कुमारच्या पराभवानंतर स्वरा प्रचंड ट्रोल झाली होती.

टॅग्स :स्वरा भास्कर