बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही फहाद झिरार अहमदसोबत विवाहबद्ध झाली. फहाद जिरार हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे.
स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. स्वरानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली आहे. स्वरा भास्करने आज लग्नाचे काही फोटो देखील ट्विट केले आहेत. यामध्ये स्वरा आणि फहाद नाचताना दिसत आहे.
मुंबईसह दिल्लीत आलिशान घर, महागड्या कार; स्वरा भास्करकडे आहे कोट्यवधींची संपत्ती
स्वरा आणि फहादच्या लग्नाचा दोघांच्या कुटुंबियांनी देखील हजेरी लावली. त्यांनी देखील कोर्ट मॅरेजचा आनंद घेतल्याचे दिसून येतंय. कोर्ट मॅरेजनंतर स्वरा आणि फहाद शाही थाटात लग्नही करणार आहेत. मार्च महिन्यात दोघं लग्न करुन पार्टी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याचदरम्यान ट्विटरद्वारे दोघेही एकमेकांची मस्ती करताना दिसून येत आहे.
फहादनेही लग्नाचे काही फोटो शेअर केले. तसेच तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार, असं फहादने म्हटलं आहे. तसेच कोर्टात नाचण्यावर मी थांबू शकलो नाही. मला असे वाटते की आनंदी वैवाहिक जीवनाचे हेच रहस्य आहे, असं फहाद म्हणाला. फहादचं हे ट्विट स्वराने रिट्विट केले आणि म्हणाली, ''मित्रा चांगली रणनीती आहे, मी पाहिलंय तु लगेच शिकतोस...''
दरम्यान, स्वरा भास्करचा जन्म दिल्लीत झाला असून सुरुवातीला तिने छोट्या पडद्यावर काम केले. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्वराचे वडील, भारतीय नौदलात अधिकारी आणि आई दिल्लीच्या जेएनयूमध्ये प्रोफेसर आहेत. त्यांची दिल्ली आणि मुंबईत घरे आहेत, त्यांचीही किंमत कोट्यावधींमध्ये आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"