आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, स्वराचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे. गत पाच वर्षांपासून स्वरा स्क्रिप्ट रायटर हिमांशू शर्माला डेट करत होती. 2016 मध्ये स्वराने ती हिमांशूला डेट करत असल्याचे सांगितले होते. अलीकडे हे कपल हॉलिडेवर गेले होते. येथून परतताना स्वरा व हिमांशू यांनी पहिल्यांदा एकत्र पोज देत, आपले नाते जगजाहिर केले होते. पण आता हे नाते संपल्याचे कळतेय.डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, स्वरा व हिमांशूने अगदी सामंजस्याने एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,दोघांनीही अगदी विचारपूर्वक ब्रेकअपचा निर्णय घेतला. अर्थात रिलेशनशिप संपले तरी दोघांचीही मैत्री कायम आहे. दोघांच्या कुटुंबीयांनाही या निर्णयाची माहिती आहे.
WHAT? स्वरा भास्करचे ब्रेकअप? पाच वर्षांपासून या व्यक्तिला करत होती डेट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 3:36 PM
आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. होय, स्वराचे ब्रेकअप झाल्याची खबर आहे.
ठळक मुद्देस्वराने तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू २, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.