बायकॉट ट्रेंडने सध्या बॉलिवूडकरांना धडकी भरली आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेकांनी या ट्रेंडवर आपलं मत मांडलं. आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker ) हिने प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत, याचं कारण बायकॉट ट्रेंड नाहीये, असं ती म्हणाली.झूम डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत स्वरा बोलली. ‘बायकॉट ट्रेंड बॉलिवूडच्या बिझनेसवर किती परिणाम करतो, हे मला माहित नाही. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आलिया भटला सोशल मीडियावर प्रचंड निगेटीव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला. त्यावेळी तिचा सडक 2 रिलीज होणार होता आणि या चित्रपटाला बायकॉट व निगेटीव्ह पब्लिसिटीचा सामना करावा लागला होता आणि याचा चित्रपटावर वाईट परिणाम झाला होता. तिचा गंगूबाई काठियावाडी रिलीज व्हायच्याआधीही अशाच गोष्टी सुरू झाल्या. तेव्हाही नेपोटिझम आणि बायकॉटची हवा होती. पण लोक सिनेमा पाहायला गेलेत आणि त्यांना तो आवडला,’असं स्वरा म्हणाली.
‘बायकॉटचा बिझनेस आता पुन्हा जोरात आहे. बायकॉट म्हणणारे लोक बॉलिवूडचा द्वेष करतात. त्यांना बॉलिवूड संपवायचं आहे आणि त्यामुळेच बॉलिवूडबद्दल चुकीच्या बकवास गोष्टी पसरवत आहेत. असं करून हे लोक पैसा कमवत आहेत, असंही मला वाटतं आणि आमच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे आहेत. बहुतेक पेड ट्रेंड आहेत. येथे असेही अनेक लोक आहेत, ज्यांनी सुशांतच्या मृत्यूचा वापर या लोकांनी पर्सनल अजेंडा चालवण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी केला,’असंही स्वरा म्हणाली.
स्वराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिचा ‘जहां चार यार’ हा सिनेमा लवकरच रिलीज होताय. या चित्रपटात तिच्यासह मेहर विज, पूजा चोप्रा, शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत आहेत.