स्वरा भास्कर (Swara Bhaskar) ही बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री. काही दिवसांपूर्वी स्वराने अक्षय कुमारची बाजू घेतली होती. अक्षय सर्वांचं सॉफ्ट टार्गेट आहे, असं ती म्हणाली होती. आता स्वरा करण जोहरच्या बाजूने मैदानात उतरली आहे. दिवंगत अभिनेत सुशांत सिंग राजपूत व करण जोहर यांच्याबद्दल एका मुलाखतीत ती बोलली. करण जोहरला तेच लोक टार्गेट करत आहेत, जे 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अटॅक मोडमध्ये होते, असं स्वरा म्हणाली.
काय म्हणाली स्वरा‘कनेक्ट एफएम’ला दिलेल्या मुलाखतीत स्वरा बिनधास्त बोलली. ती म्हणाली, इंडस्ट्रीत सध्या दहशतीचे, भीतीचे वातावरण आहे. कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीत पडायला नको, असाच सगळे विचार करत आहेत. इथे काही तरी नक्की सुरू आहे, असं इंडस्ट्रीतल्या लोकांना जाणवू लागलं आहे. त्यामुळे काहीच बोलायला नको. सगळे दहशतीत आहेत. कधी काय होईल माहित नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर कोणी आपलं मत मांडू इच्छित नाही,’असं स्वरा म्हणाली. यावेळी तिने सुशांत सिंग प्रकरणावेळी लक्ष्य करण्यात आलेल्या करण जोहर व अन्य सेलिब्रिटींचं उदाहरण दिलं.
तो काही खुनी नाही...करण जोहर सारख्या सेलिब्रिटीला लक्ष्य केलं गेलं. पण कोणी काहीही बोललं नाही. कारण सर्वांना ट्रोलर्स आणि टीकाकारांची चिंता हाती. बेकार का पंगा नहीं चाहिए,असं म्हणत अनेकांनी यावर बोलणं टाळलं. तुम्हाला करण जोहरचे सिनेमे बकवास वाटू शकतात. तो घराणेशाहीला प्रोत्साहन देतो, असं तुम्ही म्हणून शकता. जर तुम्हाला त्यांचे चित्रपट आवडत नसतील तर तुम्ही ते बघू नका. जर तुम्हाला करण जोहर आवडत नसेल तर तुम्ही ते स्पष्टपणे बोलू शकता. त्यांचे चित्रपट आवडत नसतील तर तुमचे मत मांडू शकता. तो बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठिंबा देतो, याबद्दल तुम्ही टीका करू शकता. पण तुमच्या टीकेचा अर्थ तो खूनी आहे, असा होत नाही, असं स्वरा म्हणाली.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू होऊन दोन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांतच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी त्याचे चाहते अद्याप त्याला विसरु शकलेले नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक नेटकºयांनी बॉलिवूडला लक्ष्य करत, मोहिम चालवली होती. स्वरा भास्कर हिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, नुकताच तिचा ‘जहां चार यार’ हा सिनेमा रिलीज झाला. पण बॉक्स ऑफिसवर तिचा हा सिनेमा फार काही कमाल दाखवू शकला नाही.