Join us

स्वरा भास्करने ट्वीट केले, लोकांनी ट्रोल केले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 1:37 PM

पंतप्रधान रात्रभर जागले, हे वाचून स्वरा भास्करने ट्वीट केले. ‘हा कामाचाच भाग आहे ना? की यासाठी वेगळे गुण हवेत?’ असा उपरोधिक सवाल तिने केला.

ठळक मुद्देआपल्या रोखठोक भूमिकेमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. लवकरच स्वरा भास्कर ‘फ्लेश’ या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

पुलवामा अतिरेकी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 300 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय वायु सेनेच्या  मिराज 2000 च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट, चकोटी, मुज्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण मिशन पार पडले. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी रात्रभर या मिशनवर लक्ष ठेवून होते. मीडियाच्या या वृत्तावर कुणी बोलो ना बोलो पण अभिनेत्री स्वरा भास्कर बोलली आणि प्रचंड ट्रोल झाली.

पंतप्रधान रात्रभर जागले, हे वाचून स्वरा भास्करने ट्वीट केले. ‘हा कामाचाच भाग आहे ना? की यासाठी वेगळे गुण हवेत?’ असा उपरोधिक सवाल तिने केला. या ट्वीटनंतर सोशल मीडियाच्या युजर्सनी स्वराला चहूबाजूंनी घेरले. ‘तू १८ तास काम करते का? नाही, कारण तुझ्याकडे काम नाही. तुला मोदी फोबिया झालाय,’ असे एका युजरने लिहिले. काहींनी स्वरा अजूनही गाढ झोपेत असल्याचे लिहिले.

स्वरा भास्कर याआधीही अनेकदा ट्रोल झाली आहे.  आपल्या रोखठोक भूमिकेमुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. लवकरच स्वरा भास्कर ‘फ्लेश’ या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे. यात स्वराचा अ‍ॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘फ्लेश’ ही मालिका भारतातील मानव तस्करीच्या विषयावर आधारित आहे.‘फ्लेश’ मध्ये मानवी तस्करी थांबवण्यासाठी संघर्ष करणा-या पोलीस अधिकाºयाची व्यक्तीरेखा स्वरा साकारणार आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करएअर सर्जिकल स्ट्राईकजैश-ए-मोहम्मदनरेंद्र मोदीसर्जिकल स्ट्राइक