स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येणार नवीन वळण, लवकरच मालिकेत शिवपर्वाची अखेर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 08:00 AM2018-11-22T08:00:00+5:302018-11-22T11:42:43+5:30

शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केले तो प्रसंग झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Swarajyarakshak Sambhaji New Track | स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येणार नवीन वळण, लवकरच मालिकेत शिवपर्वाची अखेर

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येणार नवीन वळण, लवकरच मालिकेत शिवपर्वाची अखेर

googlenewsNext

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या देहावसानाने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला. म्हणूनच आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या कोणत्याही नाटकात, मालिकेत, चित्रपटात शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही.

 

शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केले तो प्रसंग झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. म्हणूनच कोणत्याही नाटक, चित्रपट, आणि मालिकेतून दाखवण्यात न आलेला शिवाजी महाराजांच्या निधनाचा प्रसंग ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे.

शिवाजी महाराजांच्या निर्वाणाबाबत त्याकाळी  प्रचंड गुप्तता पाळली गेली होती, ज्येष्ठ पुत्र असूनही युवराज  संभाजी राजांना अंत्यविधीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या घटनेनंतर संभाजी राजांच्या आयुष्याला काय वळण मिळतं? रायगडावरच्या राजकारण कोणाच्या हातात जातं? अनाजी दत्तो, सोयराबाई आणि कारभारी मिळून कोणते नवे मनसुबे रचतात? औरंगजेबाच्या वाढत्या आक्रमणांना संभाजी राजे कसं थोपवतात? इतिहासाच्या हृदयात दडलेल्या या गोष्टी रसिकांना जाणून घेता येणार आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार यंदाच्या आठवड्यात झी मराठी उत्सव नात्याचा पुरस्कार २०१८ या कार्यक्रमाने बाजी मारली आहे. हा कार्यक्रम अव्वल ठरला असल्याने गेल्या कित्येक आठवड्यापासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या माझ्या नवऱ्याची बायको या कार्यक्रमाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. अभिजीत खांडकेकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. पण आता तिने या मालिकेला रामराम ठोकला असून तिची जागा इशा केसकरने घेतली आहे. रसिकाने मालिका सोडल्यानंतर त्याचा या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटले होते. पण रसिकाच्या एक्झिटनंतरही ही मालिका प्रेक्षकांच्या सगळ्यात पसंतीची मालिका आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार तिसऱ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे तर पाचव्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे. चला हवा येऊ द्या ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून पहिल्या पाच मध्ये होती. पण गेल्या दोन आठवड्यांपासून या मालिकेला आपले स्थान पहिल्या पाचमध्ये टिकवता आलेले नाही.
 

 

Web Title: Swarajyarakshak Sambhaji New Track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.