नुकतीच अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला आरोगाला पायल घोष विरोधात तिने केलेल्या तक्रारीबाबत विचारणा केली. रिचाने ट्विटमध्ये लिहिले होते की, तिने पायल घोष विरोधात तिच्याही आधी तक्रार केली होती. पण मला अजूनही त्यासंबंधी महिला आयोगाकडून काहीही समजलेले नाही. सोबतच रिचाने पायल घोषचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत होती. आता या प्रकरणावरून रिचाला अभिनेत्री तापसी पन्नूने सल्ला दिला आहे.
रिचाच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत तापसी म्हणाली की, तिने दिल्ली स्थित NCW च्या ऑफिसमध्ये जावं आणि स्वत:ला व्हिजिबल आणि ऑडिबल बनवावं. म्हणजे एकप्रकारे तापसी रिचाला पायलसारखी चर्चेत राहण्यासाठी प्रेरित करत आहे. जेणेकरून तिच्या तक्रारीवरही आयोगावर अॅक्शन घेण्याचा दबाव बनून रहावा. रिचा चड्ढाने आपल्या तक्रारीबाबत पुन्हा आठवण करून देण्यासाठी रेखा शर्मा यांना टॅग करून ट्विट केलं. ज्यावर तापसीने सल्ला दिला. ( रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत...)
रिचाने पायल विरोधात महिला आयोगात तक्रार करण्यासोबतच बॉम्बे हायकोर्टात मानहानीचा दावाही ठोकला आहे. पायल दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावत म्हणाली होती की, अनुराग कथितपणे म्हणाला होता की, रिचा चड्ढा हुमा कुरेशी आणि माही गिलसारख्या अभिनेत्री त्याला सेक्शुअल फेवर देतात. (अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -)
रिचाच्या तक्रारीवरून बॉम्हे हायकोर्टात पायलला तिचं वक्तव्य मागे घेण्यासाठी आणि सेटलमेंट करण्याचा पर्याय दिला होता. ही बाब पायलच्या वकिलांनी मान्य केली होती. पण नंतर पायलने ट्विट करून लिहिले होते की, तिने काहीही चुकीचं केलेलं नाही. तसेच ती रिचाबाबत केलेलं वक्तव्य मागेही घेणार नाही आणि ना ती तिच्या वक्तव्यासाठी कुणाला माफी मागणार आहे.
काय म्हणाली होती पायल घोष
अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले. त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला. मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.