‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) हा शो कायम कलाकारांमुळे चर्चेत असतो. अलीकडच्या काळात अनेक कलाकार हा शो सोडून गेलेत. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपक चाचा (Champak Chacha) अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट ( Amit Bhatt) प्रकृती कारणास्तव येत्या काही दिवस शोमधून गायब असणार आहे. होय, अमितला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चं शूटींग सुरू असतानाच चंपक चाचा अर्थात अमित भट्टला दुखापत झाली.
टेलिचक्करने दिलेल्या वृत्तानुसार, एका सीनमध्ये अमितला धावायचं असतं. सीन शूट होत असताना त्याचं संतुलन बिघडलं आणि तो पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. साहजिकच या घटनेने निर्मात्यांचीही काळजी वाढली आहे. दुखापतीतून पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत अमित शोमधून गायब असणार आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा शो सुरू आहे आणि आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील व्यक्तीरेखाही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. सर्वच व्यक्तोरेखांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.
अमित मालिकेत वयस्क भूमिका साकारत असला तरी तो जेठालालपेक्षाही वयाने लहान आहेत. अमित भट्टच्या पत्नीचं नाव कृती आहे. या दोघांच्याही लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. कृती लाइमलाइटपासून दूरच राहणे पसंत करते. त्यामुळे दोघे फार कमी वेळा एकत्र दिसतात. पण इन्स्टाग्रामवर मात्र ती प्रचंड सक्रीय असते. अमित आणि कृती या कपलला दोन जुळी मुलं आहेत.देव भट्ट आणि दीप भट्ट अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. हे दोघेही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडमध्येही झळकले आहेत.