Join us

‘दोस्ताना 2’मधून डेब्यू करणार ‘या’ अभिनेत्रीचा मुलगा! तब्बूशी आहे जवळचे नाते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 8:00 AM

करण जोहरने ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आणि चाहते क्रेजी झालेत. करण जोहर या चित्रपटातून आणखी एक नवा चेहरा आणणार, असेही म्हटले गेले. आता हा नवा चेहरा कोण, याचाही खुलासा झाला आहे.

ठळक मुद्देफतेह हा फराह आणि विंदू दारा सिंग यांचा मुलगा आहे.  फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे.

करण जोहरने ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आणि चाहते क्रेजी झालेत. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर लीड रोलमध्ये असणार, हे ऐकून तर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. यानंतर या चित्रपटातील सेकंड लीड अ‍ॅक्टरच्या नावाची चर्चा सुरु झाली. करण जोहर या चित्रपटातून आणखी एक नवा चेहरा आणणार, असेही म्हटले गेले. आता हा नवा चेहरा कोण, याचाही खुलासा झाला आहे.होय, हा नवा चेहरा म्हणजे, अभिनेत्री तब्बूचा भाचा. म्हणजेच, तब्बूची बहीण फराह व विंदू दारा सिंग यांचा मुलगा फतेह रंधावा. ताजी खबर मानाल तर ‘दोस्ताना 2’मध्ये फतेह सेकंड लीड भूमिकेत दिसणार आहे.

अलीकडे फतेह लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याचे विंदू दारा सिंग यांनी कन्फर्म केले होते. त्यामुळे ‘दोस्ताना 2’मधून फतेहचा डेब्यू होणार, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

फतेह हा फराह आणि विंदू दारा सिंग यांचा मुलगा आहे.  फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाºया मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले. 

त्याचदरम्यान विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला होता.  पण या दुराव्यामुळेच आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे विंदू व फराह दोघांनाही जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. त्यांना लग्नानंतर एकच वर्षांत मुलगा झाला. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि 2002 मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 

फराहचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच वर्षांत तिची ओळख सुमीत सेहगल या अभिनेत्यासोबत झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विंदू आणि फराहच्या पहिल्या मुलाला देखील सुमीतने स्वीकारले.

टॅग्स :तब्बूकरण जोहरजान्हवी कपूरकार्तिक आर्यन