Join us

"फाटलेली जीन्स तर नव्हती घातली", उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर ताहिरा कश्यप बरसली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:16 PM

Ripped Jeans Controversy: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी टीका करत वाद ओढावून घेतला होता. त्यांनी केलेल्या विधानावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच 'फाटलेल्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार? यामुळं समाजात काय संदेश जाईल?' असं म्हणत उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी टीका करत वाद ओढावून घेतला होता. त्यांनी केलेल्या विधानावर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली. सेलिब्रेटींनीदेखील विरोधात ट्विट करत संताप व्यक्त करताना दिसले. आम्ही काय घालावे काय नाही, हे सांगणारे तुम्ही कोण असे अभिनेत्रींनी आपली नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. 

 

यावरच आयुष्यमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. एका स्विमिंग पूलमध्ये फोटोसाठी पोज देत आहे.  ताहिराने शेअर केलेल्या फोटोत बिकीनी लूकमध्ये ती बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. फोटोत तिने जीन्स नाही तर बिकीनी घातल्याचा फोटो शेअर केला आणि त्याला समर्पक अशी कॅप्शन दिली. ताहिराने कॅप्शनच्या माध्यमातून उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनाच टोला लगावला आहे. ताहिराने लिहिले, "  किमान मी फाटलेली  जीन्स तर नव्हती घातली ." ताहिराच्या या पोस्टवर चाहते तिचे कौतुक करत आहेत. लाईक्स कमेंट्स देत तिला सेल्युट करत आहेत. 

 

Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का?

तर नुकतेच कविता कौशिकनेही अशाच संदर्भातील एक ट्विट केले आहे.  उघड्यावर आंघोळ करणार्‍या पुरुषांवर कोणी काही बोलत नाही. असे सांगत कविता कौशिकने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरुष उघड्यावर अंघोळ करताना दिसत आहेत.फोटो शेअर करत कविता कौशिकने लिहिले - 'प्रिय पुरुषांनो, आम्ही तुम्हाला उघड्यावर आंघोळ करतात. यावर कोणाचे लक्षही जात नाही.या गोष्टीचा लोकांना त्रासही होत नाही. त्यामुळे आम्हालाही आमची फाटलेली जीन्स घालू द्या आणि इतकंच काय तर आमची ब्राची स्ट्रिपही दिसू द्या फोटो जनहितार्थ जारी म्हणत तिने सटकून यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. सध्या कविताचे ट्विट व्हायरल झाले आहे. चाहते देखील कविताच्या विचारांचे कौतुक करत आहेत.

टॅग्स :ताहिरा कश्यप