बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ( Saif Ali Khan) लवकरच राणी मुखर्जीसोबत ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) या चित्रपटात झळकणार आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि यशराजने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या याच व्हिडीओची चर्चा आहे. होय, व्हिडीओत राणी तिची मुलगी आदिराबद्दल बोलतेय तर सैफ त्याचा मुलगा तैमूरबद्दल (Taimur Ali Khan). व्हिडीओत सैफला तैमूरबद्दल विचारलं जातं आणि सैफ लेकाबद्दल असं काही सांगतो की राणी अवाक् होते. होय, तैमूरने बँक लुटायचं ठरवलं होतं, असं सैफ सांगतो आणि राणीला ‘धक्का’ बसतो. तैमूरच्या डोक्यात बँक लुटायची कल्पना कशी आली असेल? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर ती त्याची ‘तान्हाजी’ पाहिल्यानंतरची प्रतिक्रिया होती. होय, ‘तान्हाजी’ या चित्रपटात सैफ अली खान निगेटीव्ह रोलमध्ये होता. त्याचा हा चित्रपट पाहिल्यानंतर तैमूरचं वागणं बदललं होतं.
सैफ म्हणाला, ‘तान्हाजी पाहिल्यानंतर तैमूर दिवसभर नकली तलवार घेऊन घरातील लोकांच्या मागे धावत राहायचा. वेड्यासारखा दिवसभर तो जो दिसेल त्याच्या मागे धावायचा. तो असा का वागतोय, हा प्रश्न आम्हालाही पडला होता. तो एक चांगला माणूस आहे, हा फक्त एक रोल आहे, असं मी त्याला समजावून सांगितलं. पण त्यावर, मला वाईट माणूस बनून बँक लुटायची आहे. सर्वांचे पैसे चोरायचे आहेत, असं तो म्हणायचा. मी आता हे मॅटर करिनाकडे सोपवलं आहे. याला प्लीज समजावं, असं तिला सांगितलं आहे. तैमूर सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड आहे. त्याचे फोटो व व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. याचवर्षी सैफ व करिनाला दुसरा मुलगा झाला आहे. सैफिनाने आपल्या लहान मुलाचं नामकरण जहांगीर असं केलं आहे. जहांगीरही तैमूरसारखाच क्यूट आहे. जहांगीरच्या जन्मानंतर सैफिनाने अनेक महिने त्याचा चेहरा जगापासून लपवून ठेवला होता. पण आताश: करिना स्वत: जहांगीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.