Join us

छाया घेतेय ‘न्यूड’साठी मेहनत

By admin | Published: October 06, 2016 2:44 AM

सैराट, फॅन्ड्री, मी सिंधूताई सपकाळ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

सैराट, फॅन्ड्री, मी सिंधूताई सपकाळ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदमने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ‘सैराट’मधील तिने साकारलेल्या अक्काच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता पुन्हा एकदा छाया नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. रवी जाधवच्या आगामी ‘न्यूड’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आपल्याला छाया कदम आणि कल्याणी मुळे दिसणार आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या पोस्टरमध्ये फक्त कल्याणी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर, प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये छाया कदम दिसते आहे. यासंदर्भात ‘सीएनएक्स’शी बोलताना छाया सांगते, मी जेव्हा या चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहिले होते, तेव्हा मला वाटले, अरे आपल्याला अशा प्रकारच्या भूमिका साकारायला का मिळत नाहीत. त्यानंतर, काही दिवसांनी मला रवी जाधव यांनी फोन केला आणि ‘न्यूड’ चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. मला चित्रपटाची कथा आवडली, मी लगेच होकार दिला. या भूमिकेसाठी मी विशेष तयारी करत आहे आणि बरीच मेहनतसुद्धा घेत आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.