मिल्की गर्ल तमन्ना भाटियाला काही दिवसांपासून फारशी चर्चेत नव्हती आता तिने पुन्हा सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एथनिक लूकमध्ये तिचे फोटो सा-यांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. एथनिक अंदाजातील फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून गेले आहे. तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले आहेत. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. तुर्तास या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. गेले काही दिवस ती कन्नड सिनेमा 'केजीएफ चॅप्टर-१' मधील आयटम साँगमुळे चर्चेत होती.
तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली आहे. २००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'चाँद सा' रोशन चेहरा या सिनेमातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं. मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला. सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील रसिकांनी डोक्यावर घेतलं. तिथल्या बड्या स्टार्ससह तिने रुपेरी पडदा गाजवला. दक्षिणेत नाव कमावल्यानंतर बॉलीवुडमध्ये नाव कमावण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती २०१३ साली मुंबईत आली. साजिद खान दिग्दर्शित हिम्मतवाला सिनेमातून अजय देवगणसारख्या बड्या कलाकारासह तिने हिंदीत पुनरागमन केलं. त्यावेळी तमन्ना हिम्मतवालामधून हिंदीत पदार्पण करत असल्याचे साजिदने सांगितले होते. मात्र तिने याआधीही हिंदीत काम केल्याची बाब लपवण्यात आली होती.
यानंतर तमन्ना अक्षय कुमारसह 'एंटरटेनमेंट' सिनेमात झळकली. यानंतर २०१५ साली बाहुबली- द बिगिनिंगमधून रुपेरी पडद्यावर झळकली. तमिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा बनवला होता तरी यांच्या हिंदी डब व्हर्जनने देशभरातील रसिकांना वेड लावलं. हा सिनेमासुद्धा तमन्नाचा हिंदी सिनेमा नव्हता. २०१६ साली ती सोनू सूदसह तुतक तुतक तुतिया सिनेमात झळकली. मात्र हा सिनेमा काही चालला नाही.