Join us

तांडव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:39 IST

महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे.

अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित ‘तांडव’ या मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. महिला सबलीकरणाच्या अनेक गोष्टी आपण केवळ बोलतो, परंतु त्यावर आधारीत तांडव या मराठी चित्रपटाची निर्मिती सुभाष गणपतराव काकडे यांनी केली आहे. चित्रपटाची मूळ संकल्पना रामेश्वर काकडे यांची आहे. सिनेमाचा ट्रेलर बघितल्यावर असे वाटते की, चित्रपटामध्ये ऑक्शन, नाटक, सस्पेंस खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सिनेमा हे क्षेत्र प्रभावी माध्यम असून तांडव या सिनेमातून महिला सबलीकरणाचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. या सिनेमामध्ये नील राजूरीकरने सुद्धा अफ़लातून भूमिका साकारली आहे. तर सयाजी शिंदे यांनी विरोधकाची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटामध्ये पूजाने लढाई कशी करायची, विरोधकांचा कसा पडदा फाश करायचा याचे उत्तम उदाहरण तिने दिले आहे. महिलांच्या सर्वच क्षेत्रातील उत्तुंग अशा कामगिरीबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु यावर आधारीत नायिकाप्रधान चित्रपट क्वचितच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तांडव हा सिनेमा महिलांना प्रेरणादायी ठरेल अशी आम्ही आशा बाळगतो.

 

अरूण नलावडे, पूजा रायबागी, नील राजूरीकर, आशिष वारंग, स्मिता डोंगरे, सुप्रिया गावकर आणि सयाजी शिंदे यांच्या तांडव या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. तांडव या चित्रपटाची गोष्ट एका कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस अधिकारीच्या आयुष्यावर बेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगणारी ही नायिका आहे. पूजा रायबागीने ही भूमिका अफलातून साकारली आहे. चित्रपटामध्ये तिचा संघर्ष सत्तेतील राजकारण्यांशी होतो. त्याचा ती कसा सामना करते यावर आधारीत चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष चिमाजी जाधव यांनी सत्य परिस्थिती फार उत्तम रित्या चित्रपटामध्ये मांडली आहे. 

टॅग्स :अरुण नलावडे