हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा वाद अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी तांडव या वेब सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी या प्रतरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं तांडवच्या टीमला एफआयआरपासून दिलासा देण्यास अथवा अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. तसंच संविधात देण्यात आलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र ही अमर्याद नाही, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तांडव या वेब सीरिजचे निर्माते आणि कलाकारांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दाखल करण्यात आलेले एफआयआर आणि अंतरिम जामिनाची मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसंच यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
By जयदीप दाभोळकर | Updated: January 27, 2021 17:07 IST
हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रश्नी वेब सीरिज सापडलीये वादाच्या भोवऱ्यात
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही', 'तांडव' वेब सीरिजला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
ठळक मुद्देहिंदूंच्या भावना दुखावल्याप्रश्नी वेब सीरिज सापडलीये वादाच्या भोवऱ्यातन्यायालयाकडून दिलास देण्यास नकार