Join us

या कॉमेडियनने केले कबूल, गेलो होतो दारू आणि ड्रग्सच्या अधीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 4:55 PM

या कॉमेडियनने इन्स्टाग्रामवर अतिशय इमोशनल पोस्ट लिहिली असून याबाबत सांगितले आहे.

ठळक मुद्देयावर्षीच्या सुरुवातीला माझ्या थेरपिस्टने मला विचारले की, तन्मय तू स्वतःकडे पाहिले आहेस का? हे ऐकून मी अक्षरशः रडायला लागलो. कारण मी नेहमीच माझा स्वतःचा राग करतो.

तन्मय भट हा स्टँडअप कॉमेडीयन असून तो 2009 पासून स्टँडअप कॉमेडीचे विविध कार्यक्रम करत आहे. पण त्याला एआयबी या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्याच्या कॉमिक टायमिंगचे अनेक चाहते आहेत. तन्मयला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो केले जाते. त्याने नुकतीच त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

तन्मयने इन्स्टाग्रामवर अतिशय इमोशनल पोस्ट लिहिली असून त्याचा वजन कमी करण्याचा संघर्ष आणि स्वतःचा तो करत असलेला तिरस्कार याबाबत त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आजपर्यंत या गोष्टीबाबत म्हणजेच माझ्या शरीराबाबत मी सार्वजनिकरित्या बोलणे टाळले आहे. मी अनेकवेळा कॉमेडी करताना म्हणतो की, या रूममध्ये एक हत्ती आहे. ही पंच लाईन वगळता माझ्या शरीराबाबत मी बोलतच नाही. मला माझ्याबाबत काय वाटते हा विचार करूनच मी अनेकवेळा निर्णय घेतो. 

यावर्षीच्या सुरुवातीला माझ्या थेरपिस्टने मला विचारले की, तन्मय तू स्वतःकडे पाहिले आहेस का? हे ऐकून मी अक्षरशः रडायला लागलो. कारण मी नेहमीच माझा स्वतःचा राग करतो. मी या सगळ्याचा विचार केला की, मला वाटते मी तीन दशके मागे जावे आणि बर्फीवाला शाळेतील त्या छोट्याशा मुलाला जवळ घ्यावे. मी स्वतःचाच तिरस्कार करत असल्याने मी स्वतःवर उपचार करू शकलो नाही. मी प्रचंड खायला लागलो... मी दारूच्या, ड्रग्सच्या अधीन गेलो. या सगळ्यात मी व्यायाम सोडला, मी खूप झोपायला लागलो. मी स्वतःला मदत करत नसल्याने कोणीच मला मदत करू शकत नव्हते. पण आता यावर उपचार करणे गरजेचे झाले आहे. मी यापूर्वी देखील प्रयत्न केला होता. पण मी काहीही करू शकलो नाही. पण आता मी नव्याने सुरुवात करणार आहे. या प्रवासात मी तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत. 

टॅग्स :तन्मय भट