Tanushree Dutta Controversy: त्यामुळे मी आता काही बोलू शकत नाही - नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 04:18 PM2018-10-08T16:18:27+5:302018-10-08T16:30:32+5:30
नाना पाटेकर यांनी काही वेळा पूर्वीच आपल्या घराच्या बाहेर पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाला या प्रकरणावर माझ्या वकीलांनी प्रसार माध्यमांशी काहीही न बोलण्याचा सल्ला मला दिला आहे
नाना पाटेकर यांनी काही वेळा पूर्वीच आपल्या घराच्या बाहेर पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाला या प्रकरणावर माझ्या वकीलांनी प्रसार माध्यमांशी काहीही न बोलण्याचा सल्ला मला दिला आहे. त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. नाही तर मी चार दिवसांपूर्वीच बोललो असतो, असंही नाना म्हणाले.. जे बोलायचं ते मी 10 वर्षांपूर्वीच बोललो आहे असे नानांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तनुश्री दत्तानेनाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केले आहेत. नानांनी याआधीच तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आज नाना पत्रकार परिषद घेणार होतो. मात्र त्यांचा मुलगा मल्हारने ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती दिली होती. मात्र त्यानंतर घराबाहेर जामलेल्या पत्रकारांशी नाना येऊन बोलले, ‘तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही असे नानांनी स्पष्ट केले. दरम्यान तनुश्रीने देखील शनिवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील उल्लेख आहे
#Metoo या मोहिमे अंतर्गत तनुश्रीने २००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या आरोप केला आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत.