Join us  

Tanushree Dutta controversy: तनुश्री दत्ता म्हणते, ‘बिग बॉस’ स्वर्ग अन् सलमान खान काही देव नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 3:39 PM

गेल्या काही दिवसांपासून तनुश्री ‘बिग बॉस 12’मध्ये जाणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस 12’ घरात जाण्यासाठीच तनुश्रीने नाना सोबतचे १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उखरून काढले, असा अनेकांचा आरोप आहे.या सगळ्या आरोपावर तनुश्री दत्ताने पहिल्यांदा मौन सोडले आहे.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून तनुश्री ‘बिग बॉस 12’मध्ये जाणार अशी चर्चा आहे. ‘बिग बॉस 12’ घरात जाण्यासाठीच तनुश्रीने नाना सोबतचे १० वर्षांपूर्वीचे प्रकरण उखरून काढले, असा अनेकांचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतनेही तनुश्रीवर हाच आरोप केला होता. तनुश्रीला ‘बिग बॉस 12’ च्या घरात एन्ट्री हवी आहे, म्हणून ती हे सगळे उपद्व्याप करत असल्याचे राखी म्हणाली होती. या सगळ्या आरोपावर तनुश्री दत्ताने पहिल्यांदा मौन सोडले आहे.होय, पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री यावर बोलली. मी हे सगळे ‘बिग बॉस 12’साठी करतेय, असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे, असे ती म्हणाली. तुम्हाला काय म्हणायचेयं, सलमान खान देव आणि ‘बिग बॉस’चे घर स्वर्ग आहे? असा सवालही तिने केला. काहींना सलमान देव आणि ‘बिग बॉस’चे घर स्वर्ग वाटत असेलही़ पण मला अजिबात तसे वाटत नाही. ‘बिग बॉस 12’मध्ये जाण्यासाठी मी हे केलेले नाही, असे तनुश्री म्हणाली.२००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटींगवेळी नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले आणि मनसेकडून मला धमकी दिली, असा तनुश्रीचा आरोप आहे/ तिच्या या आरोपानंतर संपूर्ण बॉलिवूड ढवळून निघाले आहे. या प्रकरणात अनेकांनी नाना पाटेकर यांची बाजू उचलून धरत, तनुश्रीचे आरोप हे केवळ सवंग लोकप्रीयतेसाठी चालवलेला खटाटोप असल्याचे नानांच्या पाठीराख्यांचे म्हणणे आहे. याऊलट बऱ्याच लोकांनी तनुश्रीचीही बाजू घेतली आहे. असे आरोप लावण्यासाठी हिंमत लागते आणि तनुश्रीने आपल्याविरूद्धच्या गैरवर्तनाविरूद्ध आवाज उठवला आहे, यासाठी तिच्या हिंमतीची दाद द्यायला हवी, अशा शब्दांत अनेकांनी तनुश्रीला पाठींबा दिला आहे. तूर्तास नाना पाटेकर आणि तनुश्रीचा वाद प्रचंड चर्चेत आहे. याप्रकरणी नानांनी तनुश्रीला कायदेशीर नोटीसही पाठवली आहे़ तनुश्रीनेही नाना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :तनुश्री दत्तानाना पाटेकरबिग बॉस 12