तनुश्री दत्ता सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आता तनुश्री स्लीम अँड ट्रीम दिसायला लागली आहे.
तनुश्रीने तिचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून तिने कित्येक किलो वजन कमी केले असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. तनुश्रीने या फोटोसोबत लिहिले आहे की, मी नवे फोटोशूट केले असून यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. हे फोटो तनुश्रीच्या फॅन्सना प्रचंड आवडले असून या फोटोत तू खूपच छान दिसत आहे असे ते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
तनुश्रीने गेल्या काही महिन्यात 15 किलो वजन कमी केले आहे. २००८ हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर अभिनेता नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक गौप्यस्फोट तनुश्रीने केला होता. तेव्हाच ती सर्वाधिक चर्चेत आली होती. २००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती 'चॉकलेट', 'ढोल', 'रिस्क','स्पीड' अशा विविध सिनेमातही झळकली.
मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं. करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला रूचलं नाही. ती निराश झाली आणि याच नैराश्यातून ती डिप्रेशनमध्ये कधी गेली हे तिचं तिला कळलं नाही. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने त्यावेळी आध्यात्माचा मार्ग स्वीकारला. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला.
बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केलं. एका मुलाखतीमध्ये तिने आपला लडाखमधील अनुभवसुद्धा शेअर केला. बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वासोच्छवास तंत्राने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितलं होतं.
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले आहे. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली. यानंतर काही वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिथेसुद्धा तनुश्री आणि आध्यात्माचा संबंध कायम राहिला. सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केलं जातं. दोनच महिन्यांपूर्वी ती भारतात परतली.