जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:52 AM2019-07-24T10:52:21+5:302019-07-24T10:52:36+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे.

Tapassi will play the role of the player who shines the name of India on the world map | जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

जगाच्या नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या या खेळाडूची भूमिका साकारणार तापसी

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. भारतीय क्रिकेट महिला संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतो आहे. यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे.  


बॉलिवूडबजच्या रिपोर्टनुसार या सिनेमासाठी तापसीचे नाव फायनल करण्यात आले आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्यात येते आहे मात्र दिग्दर्शकाचे नाव अजून फायनल करण्यात आलेले नाही. एका मुलाखती दरम्यान तापसीने सांगितले की, जर तिला मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करण्यास मिळाले तर ही भूमिका साकारण्यास ती आनंदाने तयार आहे. याआधी तापसीने सूरमा सिनेमात खेळाडूच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिनं हॉकी प्लेअरची भूमिका साकारली होती.   


लवकरच तापसी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे. यात भूमी पेडणेकर ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सांड की आँख' जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Tapassi will play the role of the player who shines the name of India on the world map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.