टीव्ही अभिनेता जय भानुशाली (Jay Bhanushali) आणि अभिनेत्री माही विज (Mahi Vij) यांची ४ वर्षांची लेक तारा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असते. तिच्या क्युटनेसने तिने सर्वांचंच मन जिंकलं आहे. ताराचे अनेक रील्सही चाहत्यांच्या भलतेच पसंतीस पडतात. मध्यंतरी ताराचा नमाज पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर मात्र जय आणि माहीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. पण या चिमुकल्या ताराने कमालच केली आहे. ती चक्क न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली आहे.
आपल्या ४ वर्षांच्या लेकीचं हे यश पाहून जय आणि माही यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद शेअर केलाय. ताराची आई असल्याचा अभिमान वाटतोय असंही माही म्हणाली आहे. जेव्हा मी म्हणतो की मला मुलीच्या चाहत्यांसारखं प्रेम हवं आहे ते मी खरंच म्हणतो. आज ती टाईम्स स्क्वेअरवर झळकली आहे, अशा शब्दात जयने भावना व्यक्त केल्या आहेत.
जय आणि माहीची ही गोड लेक तारा भानुशालीचा जन्म 3 ऑगस्ट 2019 रोजी झाला. तिचा यंदाचा वाढदिवस खूपच खास ठरला. टाईम्स स्क्वेअरसारख्या इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर तिचा व्हिडिओ झळकला. हे बघून चाहत्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. तारा माझ्याहून मोठी स्टार आहे असं जय नेहमी म्हणतो. जय आणि माही 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर ७ वर्षांनी दोघांनी केअरटेकर्सची मुलं खुशी आणि राजवीर यांचं पालकत्व स्वीकारलं. तर 2019 मध्ये तारा चा जन्म झाला. खरंतर माहीला जुळे होणार होते. मात्र तिचं एक बाळ दगावलं होतं असा खुलासा नुकताच माहीने केला होता.