Join us

'तारक मेहता...' फेम डॉ. हाथीला होती यशराज फिल्म्सची ऑफर, अभिनेत्याने दिला नकार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:17 IST

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेमुळे निर्मल सोनीला प्रसिद्धी तर मिळालीच पण, त्याबरोबरच अनेक सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. बॉलिवूडमधील नावाजलेल्या यशराज फिल्म्सची त्याला ऑफर होती. पण, अभिनेत्याने ही ऑफर नाकारत सिनेमा करण्यास नकार दिला.

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करतात. या मालिकेमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतूनच डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारून अभिनेता निर्मल सोनी घराघरात पोहोचला. 

डॉ. हाथी या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेमुळे निर्मल सोनीला प्रसिद्धी तर मिळालीच पण, त्याबरोबरच अनेक सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या. बॉलिवूडमधील नावाजलेल्या यशराज फिल्म्सची त्याला ऑफर होती. पण, अभिनेत्याने ही ऑफर नाकारत सिनेमा करण्यास नकार दिला. इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा त्याने केला आहे. "रुपेरी पडदा किंवा वेब सीरिजमध्ये कधी दिसणार?" असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना त्याने यशराज फिल्म्सची ऑफर असल्याचं सांगितलं होतं. 

"मला खूप ऑफर आल्या आहेत. यशराज फिल्म्सकडूनही मला ऑफर मिळाली होती. पण, त्या सिनेमासाठी मला ४५ दिवस लागणार होते. आणि एवढे दिवस मी टीव्ही शोपासून दूर राहू शकत नाही. म्हणून मी ही ऑफर नाकारली", असं निर्मल सोनीने सांगितलं. 

दरम्यान, निर्मल सोनीने याआधी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'ये जवानी है दिवानी', 'अॅक्शन जॅक्सन', 'होस्टल', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'चंद्रकांता', 'विस्कन्या', 'कुबूल है' या सिनेमांत तो झळकला आहे. अनेक मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार